गुहागरमधील श्री वराती देवीच्या वार्षिक महापूजेनिमित्त विविध कार्यक्रम

  • सिंगल आणि डबल बारीची जुगलबंदी

गुहागर : खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळाच्यावतीने श्री देवी वराती आईच्या वार्षिक महापुजेनिमित्त दि. १० ते १४ मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री वराती आई


श्री देवी वराती देवस्थान हे जागृत देवस्थान असून विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी देवीच्या महापुजेनीमित्त मोठा उत्सव साजरा केला जातो. दि. १४ रोजी सकाळी देवीची षोडोशोपचार विधिवत पूजा, सायं. ५ वाजता देवीची पालखी मिरवणूक सोहळा, ११ रोजी सकाळी देवीची षोडोशोपचार पूजा, श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती व अल्पोपहार, दुपारी ४ वा. कलावती आईंचे भजन, ५ वाजल्यापासून सिंगल बारी भजन, ७ वाजता महाआरती, ७.३० वाजता स्थानिक भजने तर रात्री ९.३० वाजता श्री कालभैरव प्रासादिक भजन मंडळ वेळणेश्वर यांचे बुवा संदेश ठाकूर विरुद्ध गंगा माता प्रासादिक भजन मंडळ कोंड कारूळ यांचे बुवा संदेश पोळेकर यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.


दि. १२ मे रोजी सकाळी देवीची षोडोशोपचार पूजा, दुपारी ३ ते सायं. ६ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू, ७ वाजता महाआरती, रात्री ९.३० वाजता महिला व लहान मुलांचे फनी गेम, १३ रोजी सकाळी देवीची षोडोशोपचार पूजा, सायं. ७ वाजता देवीची आरती, रात्री ९.३० वाजता गरजा महाराष्ट्राचा वारसा परंपरेचा रेकॉर्ड डान्स कार्यक्रम आणि लकी ड्रॉ सोडत काढण्यात येणार आहे.
दि. १४ रोजी देवीची षोडोशोपचार पूजा, कुंकूमार्जन सोहळा, सकाळी ८.३० वाजता नव चंडी हवन, सायं. ७ वाजता महाआरती, ७.३० ते रात्री १० देवीचा महाप्रसाद, १० वाजता सप्तरंगी कोकण कलामांच मुंबई प्रस्तुत बहुरंगी नमन कार्यक्रमाने या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी समस्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE