रत्नागिरी ये: थे आयोजित राज्यस्तरीय ओपन तायक्वॉंदो स्पर्धा तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई मान्यतेने रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य ओपन क्योरोगी आणि पुमसे तायक्वॉंदो स्पर्धा दिनांक 29 व 30 एप्रिल 2024 आणि 1 मे 2024 कालावधीत रॉयल हॉल एम.आय.डीसी रत्नागिरी येथे स्पर्धा पार पडली. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियासहसचिव व तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई महासचिव श्री. मिलिंद पठारे व तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये लांजा तालुक्यातील 23 खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत क्योरोगी म्हणजे फाईट प्रकारात लांजा तालुक्यातील ऋग्वेद प्रमोद कदम 41nकिलो आतील व तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर ओ-73 किलो वरील वजनी गटात सुवर्णपदक पदक पटकवले तसेच श्रावणी संतोष शेरे, परी संजय जड्यार यांनी रौप्य पदक मिळवले.
मायरा कुणाल जगताप, स्वर्णिम श्रेयश शेट्ये, त्रिशा गणेश यादव, तीर्था गणेश यादव, अरिहंत महेश यादव, तेजस्वी दशरथ लाड, यांनी कांस्य पदकाची कमाई केली.
या स्पर्धेत सहभागी खेळाडू शौर्य अमित जाधव, ऋग्वेद अमित जाधव ,भक्ती भगवत कुंभार, रोहन चंद्रकांत साबळे, धृव मुकेश आंब्रे, अजिंक्य प्रदीप रेवाळे ,मनस्वी प्रमोद कदम, श्रेया कांबळे, श्लोक संदीप खेडेकर,सोहम शशांक भाईशेट्ये, कुरुराज महेश चव्हाण, निषाद महेंद्र सा, ऋग्वेद प्रदीप भेकरे या सर्व स्पर्धकांना लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, तायक्वॉंदो महिला प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर, शीतल आचरेकर एक्स्ट्रिम तायक्वॉंदो क्लब चे प्रशिक्षक हर्ष जड्यार यांनी मार्गदर्शन केले.
तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजाचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सचिव तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष स. व्यंकटेशराव करा सचिव लक्ष्मण करा, उपाध्यक्ष विश्वनाथ लोखंडे, खजिनदार शशांक घडशी व सर्व पालक वर्ग आणि लांजावासी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.