कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना अदा करा

कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांची मागणी

चिपळूण : कोकण रेल्वे महामंडळाने रेल्वेच्या दुहेरी मर्गासाठी येथील शेतकर्‍यांच्या कष्टकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत, याला २० वर्षे झाली. यासाठी वर्षाकाठी गुंठ्यामागे ८० ते १२० रुपये दराने कोकण रेल्वे भाडे देत आहे. संपादित केलेल्या जमिनीचे भाडे न देता त्या जमिनी थेट खरेदी कराव्यात, अशी मागणी जमीन मालकांनी रेल्वे प्रशासनाकडे केलेली आहे. तरी एक तर कोकण रेल्वेने या संपादित जमिनी विकत घ्याव्या किंवा जमिनीचा मोबदला तत्काळ द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
कामथे हरेकरवाडी येथील २० वर्षापूर्वी ७० ते ८० लोकांच्या जमिनी रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. आता या सर्व जमिनी रेल्वे प्रशासनाने खरेदी खताने ताब्यात घ्याव्यात व हल्लीच्या बाजारभावाने आम्हाला त्याचा मोबदला द्यावा, अशी संबंधित शेतकर्‍यांची मागणी आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE