बारावी परीक्षा २०२४  : राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१ निकाल

रत्नागिरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 97.51 टक्के एका निकाल लागला आहे. कोकण विभागीय बोर्ड स्थापन झाल्यापासून याही वर्षी या बोर्डाने निकालातील आपली परंपरा कायम ठेवली आहे.

बारावी परीक्षेच्या निकालासंदर्भातील ठळक माहितीनुसार यावर्षीचा सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा निकाल 91.95 टक्के इतका लागला आहे. याही वेळी  बारावी परीक्षेत मुलींनी मारली बाजी मारली आहे. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील मुलींचा निकाल – 95.44 टक्के तर मुलांचा निकाल – 91.60 टक्के लागला. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.84 टक्के ने अधिक आहे. विभागनिहाय निकाल HSC Result 2024 । पुणे – 94.44 नागपूर-92.12 संभाजीनगर – 94.08 मुंबई – 91.95 कोल्हापूर -94.24 अमरावती -93 नाशिक -94.71 लातूर – 92.36 कोकण -97.51

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE