https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोकण रेल्वे मार्गावरील निवसर येथील कोकणी मेवा जांभळाला मोठी मागणी

0 259

लांजा :  कोकण रेल्वे मार्गावरील लांजा तालुक्यातील निवसर गाव ‘जांभूळ गाव’ म्हणून नावारूपाला आले आहे. कोकण रेल्वे प्रवासी यांनी निवसरच्या जांभूळ या कोकणी मेव्याला मोठी पसंती दिली आहे. हंगामी रोजगार जांभुळ विक्रीतून निवसर मधील अनेक कुटुंबांना रोजगार उपब्धत झाला आहे.

वडिलोपर्जित बहुसंख्य जांभूळ झाडे निवसर गावात आहेत. पूर्वी दुर्लक्षित असलेली ही फळे कोकण रेल्वे धाऊ लागल्यानंतर निवसारच्या जांभळानी मे महिन्यात उन्हाळी सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमानी, पर्यटक, कोकण रेल्वे प्रवासी यांना भुरळ घातली आहे. कोकण रेल्वेमुळे निवसरची जांभळे सर्वदूर पोहोचली आहेत. या जांभळांची चव रेल्वे प्रवाशाना आवडली आहे. निवसर शिंदेवाडी घाटकरवाडी धावडेवाडी अगदी परिसरात वडिलोपार्जित अनेक झाडे जांभळाचे आहेत. निसर्गावात जांभूळ झाडाला पोषक वातावरण आहे. काजळीनदी किनारची गाळाची माती आणि दमट वातावरण जांभळांच्या झाडांना पोषक ठरते.

दरवर्षी परिसरातील 30 ते 35 कुटुंबांना जांभूळ विक्रीतून रोजगार मिळत आहे मे महिना हंगाम जांभूळ फळांना बहर येतो. जांभूळ हे औषधी आणि पोषक फळ असल्याने या फळाला मोठी मागणी आहे दिवसाला जांभूळ विक्रीतून पाचशे ते सातशे रुपये रोज मिळत असल्याची शिंदेवाडीतील आजी सुवर्णा शिंदे यांनी सांगितले आमची जुनी जांभूळ झाडे आहेत. जांभूळ झाड उंच आहेत चढून ती फळे मोठ्या जिकिरीने काढावी लागतात. आम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रेल्वे परिसरात असतो. निवसर छोटे टेशन असल्याने केवळ क्रॉसिंगच्या वेळी थांबणाऱ्या ट्रेनला जांभूळ विक्री होते. निवसर या ठिकाणी दिवा पॅसेंजर ही एकमेव गाडी थांबते इतर सर्व गाड्या क्रॉसिंगला विरळ थांबल्या जातात जांभळाच्या झाडामागे ३० ते ४० हजारांचे उत्पन्न मिळत मिळू शकते.



निवसर गावात जांभळाची शेकडो झाडे आहेत. नवव्याने झाडांची लागवड करण्यासाठी येथील शेतकरी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे . कृषी विभागाच्या मार्गदर्शनात नवीन लागवड आणि जांभळाचे उत्पादन आणि फळाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी कृती आराखडा होणे आवश्यक आहे आमदार डॉ श्री राजन साळवी याचे निवसर जांभूळ याला मानांकन मिळण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी लक्ष वेधण्यात आले आहेत रेल्वे परिसरात जांभूळ विक्री साठी रीतसर परवानगी मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे
.

निवसर् येथील जांभळांना भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

– अशोक शिंदे, माजी सरपंच, निवसर

निवसरच्या जांभळांना मुंबई आणि लगतच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. डिसेंबर महिन्यात जांभळाच्या झाडाला मोहोर आल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळे काढणीसाठी तयार होतात. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दीड महिना जांभळांचा हंगाम सुरू राहतो.
फळावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज शेतकरी पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या फळांपासून रस निर्मिती आणि बियांपासून पावडर तयार करून विक्री होण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. मे महिन्यात जांभळाना मागणी मोठी असल्याने प्रतिकिलो हजार ते बाराशे रुपयांचा उच्चतम दर मिळू शकतो. एका झाडापासून सरासरी किमान तीनशे, तर कमाल पाचशे किलो जांभळांचे उत्पादन होते. जांभळाच्या एका झाडापासून हंगामात शेतकऱ्याला सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

मधुमेहावर गुणकारी असल्याने जांभळाचा ज्यूस आणि बियांच्या पावडरला मोठी मागणी असते. उत्पन्न वाढीसाठी जांभळापासून ज्यूस आणि बियांपासून पावडर तयार करण्याकडे शेतकऱ्यांना मार्गर्शन होणे आवश्यक आहे असे
कृषी मित्र जयवंत विचारे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.