राजापूर, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत : नीलेश राणे

सिंधुदुर्ग : आम्ही रत्नागिरी विधानसभा मतदासंघात १० हजार मतांनी मागे आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात आम्हाला मताधिक्य मिळाले नाही. या जिल्ह्याचे उदय सामंत पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जे काम करायला हवे होते ते केले नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत. ते का लीड देऊ शकले नाहीत, याबद्दल उदय सामंत बोलतील काय? आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत, असा आरोप निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. राजापूरमध्ये भाजप वाढला आहे. त्यामुळे राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा भाजपकडे यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

निवडणुकीच्या काळात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना भेटल्याचा मोठा दावा भाजपचे निलेश राणे यांनी केला. आम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत असा इशाराही त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीनंतर निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE