लांजा : लांजा तालुक्याला रविवारी मुसळधार पावसाने जोरदार झोडपले. लांजा दाभोळे रस्त्यावर आसगे येथे पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून तर दुसरीकडे निवसर येथे गोठ्यावर झाड कोसळून चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. काजळी, नावेर, मुचकुंदी या नद्यांना पूर आला असून नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत बेर्डे वाडी आणि खोरनिननको धरण क्षेत्रात कोणताही धोका नाही. तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीला पूर आल्यानेआंजनणारी येथील दत्त मंदिराला पोराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.



तालुक्यातील निवसर येथे सकाळी लक्ष्मी भिकाजी शिंदे यांच्या जनावरांच्या गोठ्यावर झाड पडून नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत त्यांचे अंदाज नुकसान रक्कम 37810/- झाले आहे. आज दिवसभर पावसाचे जोरदार बरसणे सुरू होते. पावसाची संततधार सुरु असल्याने लांजा शहरासह तालुक्यातील नदीनाले दुधडी भरून वाहत होते. लांजा शहरात लांजा शहरात वैभव वसाहत येथील रस्त्यावर पाणी आले होते.
लांजा आसगे दाभोळे राज्यमार्गावर राज्यमार्गावर आसगे येथे पुलावरून पाणी गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होती.
