- रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन
रत्नागिरी, दि. १६ : डाक विभागामार्फत सर्व नागरिकांना एका छताखाली विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी वित्तीय समावेशन विविध मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अंतर्गत १६ जुलै रोजी आंबेड बु. आणि खेड मुख्य डाकघर, १९ जुलै रोजी मंडणगड, २३ जुलै रोजी शृंगारतळी, २४ जुलै रोजी इब्राहीम पट्टण, २५ जुलै रोजी तळवडे, रामपूर, रत्नागिरी हेड पोस्ट ऑफीस आणि चिपळूण पोस्ट ऑफीस या ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून पोस्ट ऑफिसच्या सेवांचा व शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अधीक्षक डाकघर एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.
या मेळाव्यामध्ये आधारच्या सर्व सुविधा, डाक विमा, ग्रामीण डाक विमा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या सुविधा, माय स्टॅप, प्रधानमंत्री किसान योजना खाती, माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे आवश्यक आधार संलग्न खाते उघडणे, पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना, महिला सन्मान योजना, सुकन्या समृद्धी खाते, मुदत ठेव, आवर्ती ठेव, किसान विकास पत्र अशा विविध योजनांच्या सुविधा तसेच केंद्र व राज्य व स्थानिक संस्थांच्या लोक कल्याणकारी योजनांचा लाभ मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे. या मेळाव्यांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ वा. अशी असणार आहे.
