लांजात पावसामुळे सुमारे आठ लाखांचे नुकसान

लांजा :  लांजात पावसाने १५ जुलैपर्यंत सुमारे आठ लाखाचे नुकसान झाले असून दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने आलेल्या पुराने येथील एका शेतकऱ्याच्या दोन म्हशी वाहून गेल्या तर तालुक्यात 10 घरांचे, 06 गोठे 4 सार्वजनिक मालमत्ता यांचे अशंत: नुकसान झाले आहे. दोन पाळीव जनावरे पुरामुळे वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली.

तालुक्यात आतापर्यंत सरासरी 1826 मिलिमीटर पाऊस पडला आहे. अतिवृष्टीने विवली येथील बबन लांबोरे यांच्या दोन म्हशी पुरामुळे वाहून गेल्याने मृत झाल्या तर एक जखमी झाली. यामुळे लांबोरे यांचे एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे.दि.७ जुलै रोजी आलेल्या पुराने चरावयास सोडण्यात आलेल्या लांबोरे यांच्या म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. घरांचे एक लाख 82 हजार तर गोठ्यांचे दोन लाख 22000 जनावरांचे एक लाख वीस हजार सार्वजनिक मालमत्तेचे 58 हजार 1 लाख 46 हजार रुपये असे अंदाजे आठ लाख रुपये नुकसान झाले आहे.

तालुक्यातील सुनिता वीर, इंदिरा शिखरे, अनिल कासारे, मुकुंद जाधव, संतोष विचारे, पार्वती कवळकर, नंदा ढोले, लक्ष्मी शेडे, सुरेश शिंदे, सुनंदा वाघाटे, दिनकर चापटे, दीपक गुरव, एकनाथ गुरव, रामचंद्र मांडवकर 25 शेतकरी यांचे नुकसान झाले आहे जिल्हा परिषद देवराई आणि जिल्हा परिषद शाळा भांबेड या शाळांच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE