चिपळूण : तालुक्यातील नांदगाव मधील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवणच्या कृषी-रत्न या संघाद्वारे आंबा कलम बांधणी कशी करावी व त्याची जोपासना कशी करावी या बाबत शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले.
कलम बांधणी करण्यासाठी फांदीची निवड कशी करावी व बांधणी अगोदर करण्यात येणारी पूर्वतयारी तसेच त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची माहिती, या बद्दल कृषीरत्न संघातील विद्यार्थींकडून माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिक ही करून दाखवण्यात आले, या वेळी शेतकऱ्यानंमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.
कृषिदूतांकडून गावातील शेतकऱ्यांना दिलेल्या मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाद्वारे शेतकरी आधुनिक शेतीसाठी उपयुक्त ठरेल म असे असल्यानेग्रामस्थांकडून ही कृषिरत्नच्या विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाची शेतकऱ्यांनी प्रशंसा केली.
