पाणीपुरवठा विभाग सोडून सर्व विभागांचे कामकाज ठप्प
लांजा : काम काम बंद आंदोलनामुळे लांजा नगरपंचायतीचे प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत आज मंगळवारी लांजा नगर पंचायत सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पाणी पुरवठा वगळता सर्व विभागाची कामे ठप्पे झाली आहेत.
न.प./ न.पं. कर्मचारी संवर्ग कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू झाले आहे.
राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्षे अनेक विविध मागण्या प्रलंबित आहेत. विविध समस्या कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत. मात्र, त्या वर्षानुवर्षे सुटत नसल्या कारणाने शेवटी महाराष्ट्र राज्य न.प./ न.पं. कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीने कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानंतर लॉंग मार्च व शेवटी प्राणांतिक उपोषण अशा पद्धतीने टप्या टप्प्याने कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने आयुक्त तथा संचालक, नगर पालिका प्रशासन संचालनालय मनोज रानडे यांना महाराष्ट्र राज्य न.प./ न.पं. कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे मुख्य संघटक संतोष पवार आणि समन्वयक अनिल जाधव यांनी ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले.