https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

माचाळ पर्यटनस्थळी मद्यप्राशन पर्यटकांना आवाहन

0 2,116
  • खोल दऱ्यांमुळे सेल्फी काढण्यास देखील मनाई; शांतताभंग करणाऱ्यांवर कारवाईचा फलक

लांजा : लांजा तालुक्यातील समुद्रसपाटीपासून ४००० फुटावर असलेल्या माचाळ या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी मद्यप्राशन आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध लांजा पोलिसांनी कडक कारवाई करण्यासंदर्भातील फलक माचाळ येथे लावला आहे. माचाळकडे जाणारा रस्ता हा खोल दरीचा आणि दाट धुक्याचा असल्याने सेल्फी काढण्यास देखील पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.

लांजा पोलिसांनी पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. लांजा पोलिसांनी माचाळ येथे लावलेल्या फलकावर माचाळ हे गाव पर्यटनस्थळ म्हणून घोषित केलेले आहे. हे ठिकाणी उंचावर असल्याने सदर ठिकाणचा रस्ता अरुंद आणि चढ-उताराचा असल्याने एका बाजूला दरीचा भाग असल्याने रस्त्यावर दरडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी आपली वाहने वेग मर्यादित चालवावीत त माचाळ मार्गावर आणि रस्त्यावर खोल दरीचा भाग असल्याने सेल्फी काढू नयेत, सावधगिरी बाळगावी माचाळ मार्गावर वाहन चालविताना मद्य प्राशन केल्याचे आढळल्यास मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सूचित केले आहे.

माचाळ पर्यटन ठिकाणी दारू पिऊन कोणी पर्यटकांनी शांतता भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे. यासाठी लांजा पोलीस ठाणे यांनी संकटकालीन संपर्क क्रमांक दिले आहेत लांजा पोलीस ठाणे 0235120033, पोलिस निरीक्षक 9967911308, बीट अंमलदार 7798943621, गोपनीय अंमलदार 7798943621.

Leave A Reply

Your email address will not be published.