उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशन तर्फे केअर पॉइंट हॉस्पीटल, बोकडविरा, उरण येथे रायगड जिल्हा पातळी वरील वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत केली होती.सदर स्पर्धेत सुमारे ८०० लहान मोठ्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे औचित्य साधून उपस्थित स्पर्धक पालक व नागरीक यांना उरण वाहतुक पोलीस मार्फत उरण परिसरातील अपघात टाळणे करीता उपाय / वाहतुकीचे नियम पाळणे या विषयावर प्रभारी पोलीस निरीक्षक अतुल दहीफळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी प्रबोधन करून वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा
असा संदेश दिला.
वाहतूक नियम कसे पाळावे व अपघात टाळण्यासाठी काय करायला पाहिजे याची विस्तृत माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी उपस्थितांना दिली.वाहन चालवीणाऱ्या सर्व वाहकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहने व्यवस्थित चालवावीत. वाहतुकीचे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात टाळावे असे आवाहन केले.
वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक एकनिष्ठ तत्पर पोलीस अधिकारी असून त्यांनी आजपर्यंत आपल्या शासकीय सेवेत शाळा, कॉलेज मधील विद्यार्थ्यांना,अनेक लोकांना वाहतूक नियमांबद्दल मार्गदर्शन केले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाचा लाखो लोकांना फायदा झाला आहे.