उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळे बघता यावीत, त्यांचा पैसा व वेळेची बचत व्हावी, त्यांना उतार वयात देव दर्शनाचा लाभ मिळावा या अनुषंगाने चिरले उरण येथील आर्यन ग्रुप तर्फे 8 ऑगस्ट २०२४ ते १२ ऑगस्ट २०२४ दरम्यान मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
मनुष्य आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस राबराबतो. संपूर्ण आयुष्य त्याचे कष्टात, काम करण्यात जाते. मात्र उतारवयात म्हणजेच म्हातारपण आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे एकच महत्त्वाची इच्छा असते ती म्हणजे देवदर्शन. हिंदू धर्मात देव दर्शनाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आपल्या उतार वयात देवदर्शन करून आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होवो, कुटुंबातील व्यक्तींना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करत असतात.
उतारवयात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची ही व्यथा लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांचे जाण्या येण्याचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना चांगली तीर्थस्थळे बघता यावीत, ज्येष्ठ नागरिकांचा पैसा व वेळेची बचत व्हावी, त्यांना उतार वयात देव दर्शनाचा लाभ मिळावा या अनुषंगाने चिरले उरण येथील आर्यन ग्रुप तर्फे 8 ऑगस्ट २०२४ ते १२ ऑगस्ट २०२४ दरम्यान मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी आर्यन ग्रुप तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत देव दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी मोफत देवदर्शन यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. एकूण २०० हुन अधिक व्यक्तींनी या मोफत देवदर्शन यात्रेचा लाभ घेतला. पंढरपूर,अक्कलकोट, तुळजापूर, परळी वैजनाथ,औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, देवगड, रांजणगाव, आळंदी अशा विविध देवदर्शनाचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.
सदर देवदर्शन यात्रा यशस्वी करण्यासाठी चिरले ग्रामपंचायतचे सरपंच सुधाकर पाटील,आर्यन ग्रुपचे मालक समीर पाटील तसेच समीर पाटील यांचे सहकारी धोंडू वामन पाटील, मधुकर मढवी, बाबुराव ठाकूर,छाया मढवी,संदीप मढवी,प्रगती घरत यांनी विशेष मेहनत घेतली. मोफत देवदर्शन यात्रा यासारख्या चांगल्या उपक्रमाचे आयोजन केल्याने सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सरपंच सुधाकर (काका )पाटील,आर्यन ग्रुपचे मालक समीर पाटील व त्यांचे सहकारी यांचे आभार मानले आहेत.
