https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधने रुग्णांसाठी वरदायी ठरतील : डॉ. ज्योती यादव

0 61
  • चिपळूणमध्ये डॉ. करण कररा यांच्या फिजिओथेरपी सेंटरचे उद्घाटन

चिपळूण : फिजिओथेरपी ही अनेक रुग्णांसाठी अलीकडच्या काळात आवश्यक ठरत आहे. आरोग्याच्या नवनवीन समस्यांना सामोरे जाताना डॉ. करणकुमार कररा यांचं आधुनिक तंत्रज्ञान आणि साधने असलेलं फिजिओथेरपी सेंटर रुग्णांसाठी वरदायी ठरेल, अशी आशा व्यक्त करत डॉ. ज्योती यादव यांनी डॉक्टर करण कररा यांना फिजिओथेरपी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा दिल्या.


कृष्णा विश्व विद्यापीठ कराड येथे फिजिओथेरपीमध्ये प्रथम श्रेणी मिळवत फिजिओथेरपी या विषयात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या डॉक्टर करणकुमार कररा यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील चिंचघरी येथील फिजिओथेरपी सेंटरचं नुकतच उद्घाटन झालं. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती यादव यांच्या हस्ते फीत कापून हे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेकांना फिजिओथेरपी ची गरज भासते. डॉक्टर करण यांच्या या फिजिओथेरपी सेंटरमुळे चिपळूण परिसरातील अनेक रुग्णांना दर्जेदार सेवा आणि उपचार उपलब्ध होतील असंही यावेळी बोलताना त्या म्हणाल्या.


याप्रसंगी श्री. राजेश चाळके ( प्रभारी सरपंच ग्रामपंचायत चिंचघरी ) डॉ. राकेशजी चाळके (प्रदेश सरचिटणीस जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी व सरपंच चिंचघरी ) श्री शशी भाऊ चाळके (माजी सभापती पंचायत समिती चिपळूण) श्री .दिनेश चाळके (तंटामुक्ती अध्यक्ष चिंचघरी) श्री. अशोक भाई वडगावकर ) मुशतकअली मुन्नजी सय्यद या सर्व मान्यवरांनी ही डॉ. करण यांच अभिनंदन केलं आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन श्री. व्यंकटेश्वर राव कररा यांनी त्यांचे स्वागत केले. आपल्या या वाटचालीत आपले संपूर्ण कुटुंब भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचं यावेळी डॉ. करण कररा यांनी सांगितलले. उपस्थित मान्यवरांसह आजूबाजूच्या परिसरातील अनेक शुभचिंतक यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.