लांजा : लांजा तालुक्यात माकडे पकडण्याची मोहिमेत साटवली येथून २० माकडे पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.
लांजा तालुक्यातील ८ गावात माकडे वानर यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचं सर्वेक्षणामध्ये पुढे आले आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळण्यासाठी माकडे वानर यांना पकडण्याच्या मोहिमेला रत्नागिरी जिल्हा सुरुवात झाली आहे. लांजा साटवली गावात लांजा वन विभागाने पिंजरा लाऊन माकडे पकडण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत वणपाल सागर फकीर, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे, समाधान गिरी यांच्यासह अमित लांजेकर, महेश धोत्रे, शाहिद तांबोळी यांनी सहकार्य केले आहे. जिल्हयात सुमारें ४ हजारहून अधिक ममाकडांची नोंद झाली आहे.
