माखजन प्रशालेत सुसज्ज संगणक कक्षाचे उद्घाटन

आरवली : माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन(सरंद) च्या माखजन इंग्लिश स्कूलमध्ये अद्ययावत अशा संगणक,कक्षाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जनता सहकारी बँकेच्या माखजन शाखेचे व्यवस्थापक श्री अजित आंबेकर व श्री श्रीरंग चितळे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष आनंद साठे, सचिव राजेश फणसे,खजिनदार श्री संदेश पोंक्षे,श्री ओंकार पाटणकर, श्री विनायक केळकर, सौ., मीनल सहस्त्रबुद्धे, श्री गणेश सहस्त्रबुद्धे,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,पर्यवेक्षक श्री अंबादास घाडगे आदी उपस्थित होते.
संगणक कक्षा,मुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच संगणकाचे ज्ञान अवगत होण्यास मदत होणार आहे.
सुमारे ३५ विद्यार्थी एकाचवेळी स्वतंत्र संगणकासमोर बसून शिक्षण घेतील असे प्रशस्त संगणक कक्ष निर्माण करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE