https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा : सुप्रसिद्ध लेखिका प्रा. अश्विनी निवर्गी

0 87
  • आम्ही सिद्ध लेखिका, रत्नागिरीतर्फे राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळा संपन्न


रत्नागिरी : कथा लेखन करताना बदलत्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापर करा. आकर्षक ,अर्थपूर्ण शीर्षक आणि परिणामकारक शेवट, शब्दसंख्या, शुद्धलेखन, शैली, अशा महत्त्वाच्या अनेक बाबींवर लक्ष द्या. तसेच आजच्या काळानुरूप मोबाईल, संगणक इ. च्या तंत्रज्ञानाची जुजबी माहितीही आवश्यक असल्याचं प्रतिपादन प्रा. अश्विनी निवर्गी यांनी केलं.

आम्ही सिद्ध लेखिका साहित्य संस्था रत्नागिरी जिल्हा कोंकण विभाग, आयोजित केलेली कथालेखन कार्यशाळा दि. १० नोव्हेंबर २४ रोजी महाराष्ट्रातील लेखिकांसाठी दूरस्थ माध्यमातून कथालेखन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल ७५ ते ८० लेखिका या कार्यशाळेत सहभागी झाल्या.

अश्विनी निवर्गी

आम्ही सिद्ध लेखिका कोंकण विभाग, रत्नागिरीच्या अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा जोशी यांच्या पुढाकाराने आम्ही सिद्ध लेखिका च्या महाराष्ट्र राज्यातील साहित्यिक सदस्यांसाठीच कथालेखन या प्रकाराचे उत्तम मार्गदर्शन व्हावे व त्यातूनच उत्तम कथालेखिका निर्माण व्हाव्यात ह्या उद्देशाने ह्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सुप्रसिद्ध कथालेखिका प्रा. अश्विनी निवर्गी यांना निमंत्रित करण्यात आले होते. दुपारी दोन ते सहा ह्या वेळात ही कार्यशाळा झाली.
ह्या कार्यशाळेत प्रा. अश्विनी निवर्गी यांनी स्लाईड्सच्या माध्यमातून कथालेखनासाठी आवश्यक अशा मांडणीच्या अनेक मुद्यांवर सोदाहरण विस्तृत विवेचन केले.

लेखनशैली, मुद्देसूद मांडणी, शुढलेखन, कथाबीज इत्यादींवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. लिखाणासाठी उत्तम वाचनही आवश्यक असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितल. ईमेल, युनिकोड, वर्डफाईल, पीडीएफ, पेन ड्राईव्ह इ. चा वापर कसा करावा ते सांगितले. त्यांनी विविध विषयांवरील लिखाणाचं अनेक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. कार्यशाळा संपल्यावर उपस्थित लेखिकांच्या प्रश्नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
ह्या कार्यशाळेसाठी केंद्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षा मा. पद्माताई हुशिंग, ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी ह्या कार्यशाळेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच कोंकण विभाग,रत्नागिरीचेही कौतुक व अभिनंदन केले.

कार्यशाळेचा शुभारंभ सरस्वती पूजनाने कोंकण विभाग, रत्नागिरीच्या अध्यक्ष सुनेत्रा जोशी यांनी केला तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना केली. उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रा. उमा जोशी यांनी केला, केंद्रीय समितीच्या कार्याध्यक्ष मा.ज्योत्स्ना चांदगुडे यांनी शेवटी मनोगत व्यक्त केले आणि मा.अश्विनी निवर्गी यांनी केलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. स्वागत, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ. अनुराधा दीक्षित यांनी केले. या ऑनलाईन उपक्रमाची संपूर्ण तांत्रिक बाजू उमा जोशी यांनी उत्तमपणे सांभाळली.

Leave A Reply

Your email address will not be published.