कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी ‘मेगाब्लॉक’

  • तीन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

मडगाव : कोकण रेल्वे मार्गावर कारवार तसेच हरवाडा विभागात रोड अंडर ब्रिजच्या कामासाठी दिनांक 21 नोव्हेंबर तसेच १ डिसेंबर 2024 रोजी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावरील या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कारवार-हरवाडा शिक्षण मध्ये दिनांक 21 नोव्हेंबर व १ डिसेंबर 2024 रोजी चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकच्या कालावधीत RUB म्हणजे रोड अंडर ब्रिजचे काम पूर्ण केले जाणार आहे. बॉक्स पुशिंग तंत्रज्ञान वापरून कारवार ते हरवाडा दरम्यान हे काम केले जाणार आहे.

या गाड्यांवर होणार परिणाम  ⬇️

  • 1) दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सुटणारी उधना ते मंगळूर (09057) ही गाडी दोन तास रोखून ठेवली जाणार आहे.
  • 2) दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी प्रवास सुरू होणारी पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस (01197) ही गाडी मडगाव ते कारवार विभागात दोन तास रोखून ठेवली जाणार आहे.
  • 3) मडगाव ते मंगळूर दरम्यान धावणारी दिनांक 21 नोव्हेंबर 2024 आणि एक डिसेंबर 2024 रोजी ची विशेष गाडी,(06601) ही गाडी सुधारित वेळापत्रकानुसार साठ मिनिटे उशिरा चालवली जाणार आहे.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE