शिवशाही एसटी बसेस बंद करण्याचा कोणताही विचार नाही
बंद करणार असल्याच्या वृत्ताचे एसटीकडून खंडन
मुंबई : एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही (वातानुकूलित ) बसेस राज्यभरातील विविध मार्गांवर धावत आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच या श्रेणीतील बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही, एसटीच्या जनसंपर्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तांत्रिक दोषाचा हवाला देत काही माध्यमांमध्ये महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ मार्फत चालवण्यात येणाऱ्या शिवशाही बसेस बंद करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर एसटीने खुलासा देताना म्हटले आहे की, शिवशाही बसेस बंद करण्याचा महामंडळाचा कोणताही विचार नाही.