रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी जबलपूर कोईमतुर एक्सप्रेसच्या फेऱ्यांना दि. 3 जानेवारी 2025 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून ही गाडी विशेष गाडी म्हणून चालवली जात आहे. या गाडीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
मध्यप्रदेशमधील जबलपूर तसेच तामिळनाडू राज्यातील कोयमतुर अशा लांब पल्ल्यात धावणारी ही गाडी 02197/02197 मागील काही वर्षांपासून विशेष गाडी म्हणून चालवली जात आहे. या गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने या गाड्यांच्या फेऱ्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढवले आहेत.
याबाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जबलपूर ते कोयमतुर या मार्गावर दिनांक 3 जानेवारी 2025 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत तर कोयमतुर ते जबलपूर मार्गावर दिनांक सहा जानेवारी 2025 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत या गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
