गोव्यातील राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याला दोन कास्य पदके

  • परी जड्यार व योगेश तोंडारे यांची कांस्य पदकाची कमाई

लांजा : तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वॉंदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वॉंदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित खुल्या राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम म्हापसा गोवा येथे दि. १३ ते १५ डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धे करता देशाच्या विविध राज्यातून 650 खेळाडू सहभाग झाले होते तरी या स्पर्धेसाठी लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी प्रभानवल्ली लांजाचे 3 खेळाडू सहभागी झाले होते.

या स्पर्धेत परी संजय जड्यार हिने कॅडेट 37 ते 39 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले, व योगेश ईश्वर तोंडारे याने ज्युनिअर 45 ते 48 वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली तसेच तीर्था गणेश यादव हिने सहभाग घेतला होता तसेच लांजा तालुक्यातील राष्ट्रिय पंच व मंदरूळ गावची सुकन्या तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर यांची या स्पर्धेकरता पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
या सर्व खेळाडूंना लांजा तालुका तायक्वॉंदो अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर,शितल विरेंद्र आचरेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


या खेळाडूंना स्पर्धेकरिता तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील व सर्व पदाधिकारी, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी प्रभानवल्ली लांजाचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे , सदस्य रोहित कांबळे  तसेच कोर्ले ग्रामपंचायत सरपंच श्री गणेशराव साळुंके साहेब. लांजा तालुका पत्रकार संघटना अध्यक्ष सिराज नेवकर, ग्रामविस्तार अधिकारी तेजस वडवलकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE