रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात नुकसान झालेल्या छोट्या खोकेधारकांना त्यांच्या रखडलेल्या भरपाईचे वाटप शुक्रवारी रत्नागिरी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महामार्गावरील खोकेधारकांच्या नुकसान भरपाईचे वाटप व अन्य कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत हे 24 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात शुक्रवारी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यामधील खोकेधारकांना नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे आहे. नुकसान भरपाईसाठी निवडलेल्या लाभार्थींमध्ये संगमेश्वर तालुक्यातील आरवली, तुरळ, माभळे तसेच वांद्रीतील महामार्गालगतच्या खोकेधारकांचा समावेश आहे.
