- मराठी भाषा मंत्री उदय सामंत नागरिकांच्या समस्या जाणून घेणार
मुंबई : शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सोमवारी बाळासाहेब भवन, मुंबई येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
यासाठी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे उद्या सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता उपस्थित राहणार आहे. सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.