रत्नागिरी : सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार श्री. नारायण राणे यांच्या प्रेरणेतून सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एडीप व वयोश्री या भारत सरकारच्या योजनेअंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना मोफत साहित्य वाटपाकरिता तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिव्यांग व 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांनी या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ADIP योजना अंतर्गत पात्र दिव्यांग प्रवर्ग पुढीलप्रमाणे राहील
- अस्थिव्यंग, 2. बहुविकलांग, 3. सेरेब्रल पाल्सी, 4. कर्णबधिर, 5. पुर्णतःअंध, 6. क्षीण दृष्टी, 7. कुष्ट रोग निवारित, 8. बौद्धिक अक्षम (18 वर्षा खालील). त्यांना पुढील प्रमाणे अपंगत्वानुसार सहाय्यक साधने मिळू शकतील.
ADIP योजने अंतर्गत दिव्यांगांसाठी मिळणारे साहित्य:-
तीन चाकी सायकल, व्हिल चेअर, बॅटरीवर चालणारी मोटाराइज्ड तीन चाकी सायकल, कुबड्या, वॉकींग स्टिक, सीपी चेअर, रोलेटर, बीटीई श्रवणयंत्र, ब्रेल केन, ब्रेल स्लेट, ब्रेल किट, सुगम्य केन, स्मार्ट फोन, कृत्रिम अवयव, जेल कुशन, कॅलिपर, ADL कीट इत्यादी
ADIP योजनेअंतर्गत दिव्यांगजनांकडून सोबत आणावयाची कागदपत्रे - UDID कार्ड किंवा अपंगत्व प्रमाणपत्र किमान 40% व UDID साठी नोंद केलेली नोंद पावती
- आधारकार्ड झेरॉक्स
- उत्पन्नाची प्रत (सर्व श्रोताकडून मासिक उत्पन्न रू. 22,500/- पेक्षा जास्त नसावे. (महसूल विभाग / बीपीएल रेशनकार्ड प्रत/वार्षिक उत्पन्न 2,70000 च्या आतील उत्पन्न नोंदविलेले रेशनकार्ड/अपंगत्व पेंशन प्रमाणपत्राची प्रत / मा. खासदार / मा. आमदार / जिल्हा परिषद / ग्रामप्रधान सरपंच इ. प्रमाणपत्र)
- अंध दिव्यांग लाभार्थ्याच्या बाबतीत शैक्षणिक नांव नोंदणीचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड)
- अपंगत्व दर्शविणारे एक फोटो-अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, कुष्ट रोग निवारित.
- पासपोर्ट साईझ फोटो.
वयोश्री योजनेकरिता पात्र लाभार्थी:- 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक (60 वर्षावरील वय दर्शविणारा पुरावा झेरॉक्स प्रत सोबत आणावी.
वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे साहित्य:-
व्हिल चेअर, कमोडसह व्हिल चेअर, कमोड स्टूल, कुबड्या, चालण्यासाठी काठी, ट्रायपॉड, टेट्रापॉड, चष्मा, श्रवणयंत्र, मानेचा पट्टा, गुडघा बेल्ट, दाताची कवळी, कमरेचा पट्टा, पाठीचा पट्टा, इत्यादी मिळू शकेल.
वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरीकांकडून सोबत आणावयाची कागदपत्रे :- - आधारकार्ड झेरॉक्स
- उत्पन्नाची प्रत (सर्व श्रोताकडून मासिक उत्पन्न रू. 15,000/- पेक्षा जास्त नसावे. (महसूल विभाग/बीपीएल रेशनकार्ड प्रत/ वार्षिक उत्पन्न 1,80000 च्या आतील उत्पन्न नोंदविलेले रेशनकार्ड/ मा. खासदार/ मा. आमदार/ जिल्हा परिषद/ ग्रामप्रधान सरपंच इ. प्रमाणपत्र)
- पासपोर्ट साईझ फोटो.
शिबिराचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
1. रत्नागिरी-
24/02/2025 रोजी
एडीप, वयोश्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे
10:00 ते 05:00 या वेळेत
2. राजापूर
25/02/2025 रोजी
एडीप, वयोश्री
किसान भवन पंचायत समिती, राजापूर. येथे
10:00 ते 05:00 या वेळेत
3. लांजा
27/02/2025 रोजी
एडीप, वयोश्री
आग्रे मंगल कार्यालय, लांजा. येथे
10:00 ते 05:00 या वेळेत
4. संगमेश्वर
28/02/2025 रोजी
एडीप, वयोश्री
पंचायत समिती कार्यालय, देवरुख. येथे
10:00 ते 05:00 या वेळेत
5. चिपळूण
01/03/2025 रोजी
एडीप, वयोश्री
ग्रामीण रुग्णालय कामथे, चिपळूण येथे
10:00 ते 05:00 या वेळेत तपासणी होणार आहे.
खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार उपरोक्त तपासणी शिबिरात सर्व लाभार्थी उपस्थित राहून शिबिरांचे आयोजन यशस्वी होईल या करिता गट विकास अधिकारी यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.रत्नागिरी , श्री.किर्तीकिरण पूजार यांनी दिल्या आहेत.
