- कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची यशस्वी मध्यस्थी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : एप्रिल २०२४ पासून प्रलंबित असलेल्या मास्टर मरीन सर्व्हिसेस (PUB) या कंपनीतील सर्वेअर कामगारांचा पगारवाढीचा करार छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीच्या दिवशी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या उलवे येथील कार्यालयात संपन्न झाला.
केंद्रासरकारच्या अडमुठ्या धोरणांमुळे एकीकडे मालकांना कंपनी चालवीने मुश्किल होत चाललं असतांना दुसरीकडे कामगार संघटनांना कामगारांचे हक्क अबाधित ठेवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे या दोघांची योग्य सांगड घालत कामगारांना न्याय देण्यात यश्यस्वी होताना दिसत आहेत.
या करारनाम्या नुसार कामगारांना ४५०० रुपये पगारवाढ, ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, कामगार कायद्यानुसार बोनस, १५०० रुपये प्रत्येकी एलटीए देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
या करारनाम्या प्रसंगी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत,कार्याध्यक्ष पी. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील तर व्यवस्थापनातर्फे नितीन महाजन, रोनक शुक्ला, भाऊ ठाकूर, विलास शिरोळे तसेच कामगार प्रतिनिधी उत्तम पाटील, गजानन ठाकूर, परेश थळी आदी उपस्थित होते.यावेळी कामगार वर्गांनी कामगार नेते महेंद्र घरत व त्यांच्या टीमचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
