- मध्य रेल्वेने पहिल्यांदाच ऐतिहासिक पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला
- प्रतिष्ठित वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांसह चालवली
- सर्व महिला कर्मचाऱ्यांसह विशेष मालवाहतूक ट्रेन चालवली
मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ८ मार्च २०२५ रोजी सर्वच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी प्रतिष्ठित वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालऊन अनोखा विक्रम नोंदवला.

ट्रेन क्रमांक 22223, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ही महिला कर्मचाऱ्यांनी चालवली आणि व्यवस्थापित केली, ज्यामुळे हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवास ठरला. ही ट्रेन आशियातील पहिल्या महिला लोको पायलट श्रीमती सुरेखा यादव आणि सहाय्यक लोको पायलट श्रीमती संगीता कुमारी यांनी चालवली.

या गाडीवर श्रीमती श्वेता घोणे यांनी ट्रेन व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आणि प्रवासादरम्यान सुरळीत कामकाज सुनिश्चित केले.
प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांचा आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी महिला प्रवास तिकीट परीक्षकांची एक समर्पित टीम तैनात करण्यात आली होती.
टीम मध्ये यांचा समावेश होता:
मुख्य तिकीट परीक्षक :- श्रीमती अनुष्का के.पी आणि श्रीमती एम.जे. राजपूत
वरिष्ठ तिकीट परीक्षक: श्रीमती सारिका ओझा, श्रीमती सुवर्णा पाष्टे, श्रीमती कविता मराळ श्रीमती मनीषा राम.
महिला कर्मचाऱ्यांमध्ये प्रवाशांची सेवा करण्यासाठी सज्ज असलेल्या ऑनबोर्ड ट्रेन होस्टेसची टीम होती.
टीम मध्ये यांचा समावेश होता: कु. मोनिका, श्रीमती रुबिना, कु. पूजा, कु. नम्रता आणि कु. उमा.
महिला कर्मचाऱ्यांसह वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटली, जी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
भारतातील पहिले महिलांनी चालवलेले वंदे भारत एक्सप्रेस माटुंगा स्थानक येथून पास होतानाचे दृश्य हृदयस्पर्शी होते. माटुंगा स्थानकाच्या संपूर्ण टीमने ट्रेन व्यवस्थापकाशी सिग्नलची देवाणघेवाण केली आणि आनंद व्यक्त केला.

दिनांक ०८.०३.२०२५ रोजी मुंबई विभागात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून सर्व महिलांनी एक विशेष मालगाडी चालवली, ज्यातून भारतीय रेल्वेमधील महिलांची ताकद आणि क्षमता दिसली.
कल्याण ते ट्रॉम्बे या विशेष मालगाडीत ११५० टन वजन वाहून नेणाऱ्या ४३ वॅगन होत्या. लोको पायलट म्हणून श्रीमती संगीता सरकार, असिस्टंट लोको पायलट म्हणून श्रीमती तेजस्वी वाळके आणि ट्रेन व्यवस्थापक म्हणून श्रीमती रोहिणी जाधव यांनी ही गाडी चालवली.
हा ऐतिहासिक उपक्रम भारतीय रेल्वेमधील महिलांच्या समर्पणाला आणि उत्कृष्टतेचा गौरव आहे आणि रेल्वे परिचालनामध्ये जेंडर समावेशकतेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ, पुणे आणि सोलापूर विभागातही आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
नागपूर विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात मोठ्या संख्येने महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल विविध विभागातील ६९ उत्कृष्ट महिला कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. नागपूर विभागात १,५७९ महिला कर्मचारी आहेत, त्यापैकी अजनी स्टेशन पूर्णपणे २२ महिलांद्वारे व्यवस्थापित केले जाते, ज्या रेल्वे परिचालन, बुकिंग, तिकीट तपासणी, सुरक्षा आणि सिग्नल आणि टेलिकॉम कामे हाताळतात.
महिला कर्मचाऱ्यांच्या कौशल्य आणि समर्पणाचे दृश्य घडवणारा एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे भुसावळ विभागात पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापित एक विशेष मालगाडी चालवण्यात आली.
ही ट्रेन लोको पायलट श्रीमती ज्योती सिंग, असिस्टंट लोको पायलट श्रीमती शिवानी आणि ट्रेन व्यवस्थापक श्रीमती भाग्यश्री पिंपळे यांनी चालवली.
पुणे विभागात, महिला रेल्वे संरक्षण दलाने कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या महिला बराकीचे उद्घाटन करण्यात आले. पुणे उपनगरीय भागात काम करणाऱ्या उर्वरित महिला रेल्वे संरक्षण दल कर्मचाऱ्यांसाठी, कोल्हापूर, सातारा, सांगली, दौंड, अहमदनगर (अहिल्यानगर) सारख्या विभागातील इतर ठिकाणी तैनात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आणि मुंबई विभाग आणि सोलापूर विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी जे ट्रेन एस्कॉर्टिंग ड्युटीसाठी पुण्यात येतात त्यांच्यासाठी हे बॅरेक्स अत्यंत उपयुक्त आहेत.
सोलापूर विभागात, सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22226/22225) मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील तिकीट तपासणी पथक तैनात करण्यात आले होते.
महिला पथकाने रेल्वे सेवेतील तिकीट तपासणीचे काम कुशलतेने केले, जे प्रवासी सेवा आणि रेल्वे कामकाजाप्रती त्यांची क्षमता आणि वचनबद्धता दर्शवते.
हा उपक्रम महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये महिलांच्या अमूल्य योगदानाची दखल घेण्यासाठी विभागाच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकण्याचा होता. भारतीय रेल्वेमधील महिलांच्या ताकद, समर्पण, कौशल्य आणि नेतृत्वाचा गौरव करणारे हे खरोखरच अभिमानाचे क्षण होते.
