रत्नागिरी : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोमेश्वर शांतिपीठ , सोमेश्वर येथील गोशाळेला रत्नागिरीतील सुप्रसिद्ध निरामय योग कक्षेमार्फत रू. ८१०००/- रकमेचा धनादेश देण्यात आला. निरामयच्या सर्व साधकांचे यामध्ये मोलाचे योगदान राहिले.
निरामय योगाचे सर्वेसर्वा श्री. विरू स्वामी यांनी त्यांच्या साधकांसमवेत सोमेश्वर येथे जाऊन तेथील व्यवस्थापन समितीकडे धनादेश मदतीचा सूपूर्द केला.
यावेळी व्यवस्थापक कमिटीने शांतिपीठाच्या भविष्यातील उपक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. निरामय योगसंस्था योग प्रशिक्षणासोबतच नेहमीच इतरही अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते.अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गोशाळेस मदत करून त्यांनी आपला अखंड सामाजिक सेवेचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या आर्थिक मदतीसाठी निरामयच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गोशाळेस मदत करून त्यांनी आपला अखंड सामाजिक सेवेचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या आर्थिक मदतीसाठी निरामयच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.
