रत्नागिरीत दोन तरुणांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळले; आत्महत्या केल्याचा संशय

रत्नागिरी : शहरा नजीकच्या एमआयडीसी क्षेत्रातून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या मार्गावर दोन तरुणांचे मृतदेह  आढळून आले. या दोघांपैकी एकाची ओळख पटली असून मृत तरुण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी आहे.

एमआयडीसी परिसरातील रेल्वे ब्रिज ते प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात दोन मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यातील एका तरुणाची दत्ता बिरा यमगर (34, राहणार सांगोला जिल्हा सोलापूर ) अशी ओळख पटली आहे तर रेल्वे ब्रिज ते आरटीओ कार्यालय परिसरात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. यातील एका घटनेत तरुणाच्या शरीरावरून रेल्वे गाडी गेल्यामुळे शीर हे धडापासून वेगळे झाले होते. या घटनांमधील तरुणांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

या दोन्ही मृतदेहांची जिल्हा शासकीय रुग्णालय उत्तरीय  तपासणी करण्यात आली

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE