कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वतीने ३ मे रोजी ‘नैसर्गिक जीवनपद्धती’वर चर्चात्मक कार्यक्रम

रत्नागिरी :  अन्नाची उपयुक्तता, पालटत्या जीवनशैलीमुळे होणारे निरनिराळे आजार आणि त्यावर साधे साधे उपाय, काही औषधी झाडांची पाने, फुले आणि त्यांचे निरनिराळ्या आजारातील लाभ, तसेच काही घरगुती उपचार यांची माहिती देणार्‍या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले आहे.

चिपळूण येथील श्री. सदाशिव बापट हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप चर्चात्मक असून शनिवार, दिनांक ३ मे २०२५ या दिवशी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे यशवंत हरि गोखले भवन, नाचणे साळवी स्टॉप रोड, हवामान वेध शाळेसमोर, रत्नागिरी येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रायोजक आगाशे स्टोअर्स प्रा. लि. हे असून कार्यक्रम विनामूल्य आहे. आपली तब्येत उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येकाने या चर्चासत्राच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE