कोकण रेल्वेचे बेलापूर कॉर्पोरेट कार्यालयात सुरक्षा चर्चासत्र

बेलापूर : कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे परिचालन राखण्यासाठी सतर्कता, वेळेवर घटनांची माहिती देणे आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे या महत्त्वाच्या भूमिकेवर मार्गदर्शन करण्यात आले.

सतर्कतेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.या अंतर्गत१२ कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुकरणीय सतर्कतेबद्दल सन्मानित करण्यात आले आणि कर्तव्यावर असताना सुरक्षिततेशी संबंधित घटनां नंतर त्वरित उपाययोजना केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्रे आणि जागेवर रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कोकण रेल्वे आयोजित सुरक्षा चर्चासत्रात उपस्थित कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा,डायरेक्टर ऑपरेटिंग सुनील गुप्ता, डायरेक्टर वर्क्स आर के हेगडे व अन्य वरीष्ठ अधिकारी.

कोकण रेल्वे नेटवर्कमध्ये नियोजित १२ सुरक्षा चर्चासत्रांच्या मालिकेतील हा पहिलाच कार्यक्रम होता – सर्व स्तरांवर सुरक्षिततेची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी – बेलापूर, रत्नागिरी आणि कारवार येथे प्रत्येकी चार चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE