10th Exam Result | अन्वय सचिन देसाई दहावी परीक्षेत जीजीपीएस गुरुकुलमध्ये प्रथम

रत्नागिरी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालानुसार कोकण रेल्वेच्या रत्नागिरी क्षेत्रीय कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांचा चिरंजीव अन्वय सचिन देसाई याने ९७ टक्के गुणांसह येथील जी. जी. पी. एस. प्रशालेच्या गुरुकुल शाळेमध्ये प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे..

अन्वय देसाई हा सुरवातीपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात असे. हे त्याने मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात दाखवून दिले आहे. दहावी परीक्षेतील अन्वयच्या या घवघवीत यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जी.जी. पी. एस. गुरुकुल प्रकल्पासह सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE