Ratnagiri news alert | तेरा बांगलादेशी घुसखोरांना केले बांगलादेशाकडे रवाना

रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी पकडलेल्या १३ बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या शिक्षेची मुदत संपल्यामुळे मायदेशी पाठवण्याच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर बांगलादेशात परत पाठवण्यात आले आहे. हे सर्वजण भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश करून राहत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. नोव्हेंबर 2024 मध्ये या तेरा बांगलादेशीना मी पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडण्यात आले होते

ही कारवाई पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त तपासातून करण्यात आली. या व्यक्तींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने ओळखून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे कोणतेही वैध ओळखपत्र किंवा प्रवास दस्तऐवज नव्हते.

त्यांना पकडल्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर संबंधित यंत्रणांनी त्यांची ओळख पटवून अटक करण्यात आली होती त्यांच्या कारावासाची मदत संपल्यामुळे त्यांना बांगलादेशच्या ताब्यात दिले जाणार आहे. त्यासाठी त्यांना रवाना करण्यात आले आहे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE