कोकण रहिवासी संघटना उलवे नोडतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : कोकण रहिवासी संघटना उलवे नोड मार्फत जिल्हा परिषद शाळा गव्हाण येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेण आणि पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या बद्दल शाळेचे मुख्याधापक यांनी कोकण रहिवासी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत संघटनेच्या पुढील कार्यासाठी, वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.

या कार्यक्रमासाठी सचिन राजे येरुणकर, सुहास देशमुख, मंगेश अपराज (प्रितम म्हात्रे यांचे पीए ), राजन घरत (अध्यक्ष भात गिरणी ), चंद्रकांत बाकलकर, जितू राणे, महेश मगर, अनुप चौगुले,रमेश खडूं, साई पैकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE