रत्नागिरी : गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. चिपळूण आणि पनवेल दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्या (MEMU) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जाणे अधिक सोपे होणार आहे.
गाडी क्र. ०११६० / ०११५९ चिपळूण-पनवेल-चिपळूण मेमू अनारक्षित विशेष:
- गाडी क्र. ०११६० चिपळूण-पनवेल मेमू अनारक्षित स्पेशल चिपळूण येथून दिनांक ०५/०९/२०२५, ०६/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी सकाळी ११:०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेल येथे संध्याकाळी १६:१० वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. ०११५९ पनवेल-चिपळूण मेमू अनारक्षित स्पेशल पनवेल येथून दिनांक ०५/०९/२०२५, ०६/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी संध्याकाळी १६:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:५५ वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
थांबे आणि संरचना:
ही गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवती, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागठाणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे या स्थानकांवर थांबेल. या गाडीमध्ये एकूण ०८ मेमू कोच असतील.
अधिक माहितीसाठी:
या विशेष गाड्यांच्या सविस्तर थांब्यांसाठी आणि वेळेसाठी कृपया भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.
ही अतिरिक्त सेवा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
