Konkan Railway | गुजरातमधून रत्नागिरीसाठी आणखी विशेष गाड्या धावणार!

  • कोकणात येणारे भाविकांसाठी पश्चिम रेल्वे गणेश चतुर्थीसाठी चालवणार स्पेशल ट्रेन
  • उधना ते रत्नागिरी मार्गावर वसईमार्गे धावणार गणपती स्पेशल ट्रेन

रत्नागिरी : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, पश्चिम रेल्वे (WR) उधना ते रत्नागिरी तसेच विश्वामित्र ते रत्नागिरी  दरम्यान आणखी गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या चालवणार आहे. यातील उधना ते रत्नागिरी ही गाडी दि. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत साप्ताहिक चालवली जाणार आहे.

ट्रेन क्रमांक 09022 साठी आरक्षण दि. 20.08.2025 पासून सर्व पीआरएस (PRS) काउंटरवर आणि आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाइटवर सुरू होईल.

गणेश चतुर्थीच्या या काळात अनेक प्रवासी आपल्या गावी परत जातात, त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या स्पेशल ट्रेनमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडीच्या अधिक माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE