रत्नागिरी: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या आगामी 14 वर्षांखालील गटाच्या सामन्यांसाठी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे (RDCA) मुलांची निवड चाचणी (ट्रायल) आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रत्नागिरी येथे होणार आहे.
निवड चाचणीचे वेळापत्रक:
- 14 वर्षांखालील मुले: शनिवार, 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता
- 16 वर्षांखालील मुले: रविवार, 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता
या निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आपले क्रिकेट साहित्य व गणवेश सोबत आणणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- रु. 200/- प्रवेश शुल्क
- आधार कार्ड
- 1 सप्टेंबर 2011 नंतरचा जन्माचा दाखला (Birth Certificate)
रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. किरण सामंत, कार्यवाह श्री. दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, आणि सचिव श्री. बिपिन बंदरकर यांनी खेळाडूंना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
- श्री. मनोहर गुरव (सहसचिव) – 9890747525
- श्री. बलराम कोतवडेकर (सहसचिव) – 9921003394
ही निवड चाचणी युवा क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि एमसीएच्या संघात स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र खेळाडूंनी दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
