रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव रत्नागिरी च्या विद्यार्थ्यांनी दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी जागतिक मत्स्य व्यवसाय दिन निमित्ताने जलजीविका या स्वयंसेवी संस्थेसोबत शिरगांव खाडी कांदळवन मध्ये जाऊन कांदळवनातील वृक्षांची आणि परिसंस्थेची माहिती घेतली. जलजीविकेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्था समजावून सांगितली.
कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, सौ. मयुरी डोंगरे- सुर्वे, श्री. सुशिल कांबळे आणि श्री. भाटकर, जलजिविका पुणे चे चिन्मय दामले, पियुषा शेलार यांनी यशस्वीरित्या केले.














