उरण दि ९(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील चिरनेर,कातळपाडा येथील निवृत्त ग्रामविकास अधिकारी कृष्णा सोमा केणी (८७) यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दुर्गम अशा निगडे ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी अधिक काळ तर उरण तालुक्यातील चाणजे,कळंबूसरे व मोट्ठीजुई आदी ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून उत्तमरित्या काम केले आहे.
एक शिस्तबद्ध ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांचे नावलौकिक होते तर निवृत्ती नंतर मागील २९ वर्षे त्यांनी कृषिक्षेत्रावर अधिक भर देण्याचे योगदान दिले असून,चिरनेर परिसरात आंबा बागायती फुलविण्याचे केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.त्यामुळे त्यांच्या अंत्य यात्रेसाठी नातेवाईक मित्रमंडळी,विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतकांनी गर्दी केली होती. त्यांच्यामागे त्यांची पत्नी, मुलगा, सुना, सासुरवाशीण मुली आणि नातवंडे,पतवंडे असा त्यांचा परिवार आहे.














