रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड (Sangameshwar) स्थानकावरून पनवेल, वसई रोड मार्गे मुंबई आणि गुजरातकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. रेल्वे बोर्डाने दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना नव्याने थांबा मंजूर केल्यामुळे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मुंबईकडे जाण्यासाठी तीन गाड्यांचचा नवीन रेल्वे पर्याय उपलब्ध झाला आहे.
बोर्डाच्या निर्णयानुसार पोरबंदर – तिरुवनंतपुरम साप्ताहिक एक्सप्रेस आणि जामनगर – तिरुनेलवेली द्वैसाप्ताहिक एक्सप्रेस या दोन गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
गाड्यांचा वेळ व तपशील
तिरुवनंतपुरम – पोरबंदर साप्ताहिक एक्सप्रेस
➤ दर सोमवारी सकाळी 9.00 वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर आगमन
➤ मुंबईच्या दिशेने प्रवासासाठी उपयुक्त
तिरुनेलवेली – जामनगर (19577/78) एक्सप्रेस (आठवड्यातून दोनदा)
➤ दर मंगळवारी आणि बुधवारी सकाळी 9.00 वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर आगमन
➤ दोन मिनिटांच्या थांब्यानंतर मुंबई व गुजरातच्या दिशेने रवाना.
या नव्या थांब्यांमुळे आठवड्यातून किमान तीन वेळा संगमेश्वर येथील प्रवाशांना मुंबईकडे जाण्या-येण्यासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्याने कोकणवासीयांचा मुंबई-गुजरात प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.













