RatnagiriNews | अंगणवाडीच्या रिक्त मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पमार्फत
८ जानेवारीपर्यंत अर्ज मागवले

रत्नागिरी, दि. 29 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 मार्फत शिरगाव ग्रामपंचायती मधील झाडगाव एमआयडीसी अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरावयाचे आहे. तरी इच्छूक स्त्री स्थानिक उमेदवारांनी 8 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी 1, साईप्रसाद बंगला, एकता मार्ग, मारुती मंदिर येथे अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक माहितीसाठी सुटटीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत संपर्क साधावा. नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील. खाडाखोड असलेले अर्ज किंवा कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 यांनी केले आहे.


शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण आवश्यक (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) गुणपत्रक आवश्यक असून पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड, बी.एड असल्यास गुणपत्रक आवश्यक आहे. ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे मधील रहिवासी असणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी (By Nomination) वयोमर्यादा किमान 18 व कमाल 35 वर्षे अशी राहिल. तथापि, विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल 40 अशी राहील. विधवा/अनाथ असल्याबाबत दाखला, लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती तसेच इतर मागास प्रवर्ग/विमुक्त जाती/भटक्या जमाती/आर्थिकदृष्टया दुर्बल घटक/ विशेष मागास प्रवर्ग/ सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास वर्ग या प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला जोडला असल्यास गुणांकन देण्यात येईल. अंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असल्यास दाखला आवश्यक, शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक (एमएससीआयटी) अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरविलेला संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास आवश्यक. गुणांकन 30 जानेवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार राहील.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE