अश्विन पाटील क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप

उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : अश्विन पाटील हे एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट व्यक्तिमत्व होते. उरण तालुक्यात सर्वांना ते सुपरिचित होते. सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांच्या सुख दुःखात सहभागी होत अश्विन पाटील यांनी सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने ॐ साई ग्रुप सातरहाठी नावाने जानेवारी २०१५ पासून मित्र परिवारला सोबत घेऊन आपले सामाजिक कार्य सुरु केले. अश्विन पाटील यांनी सुरु केलेले तेच कार्य आज अश्विन पाटील यांच्या पश्चात त्यांच्याच नावाने अश्विन पाटील क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था स्थापन करून अश्विन पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेऊन अश्विन पाटील यांचा मित्र परिवार समाजकार्य करत आहे.

नवीन वर्षाचे औचित्य साधून दि ०१/०१/२०२६ रोजी दरवर्षी प्रमाणे उरण तालुक्यातील चिरनेर येथील आश्रम शाळेत खाऊ, शैक्षणिक साहित्य आणि इतर गरजेच्या अत्यावश्यक वस्तू देऊन नवीन वर्षाची गोड सुरवात करण्यात आली.

यावेळी चंदन भगत,तुषार पाटील,गणेश पाटील,सागर मसुरकर,दिनेश चव्हाण,कुणाल पाटील,कमलेश पिंपळे,सूरज भोईर,साहिल कांबळे,वृषाली पाटील,प्रदिप्ती पाटील,माधुरी पाटील,तेजस्विनी माळगावकर आदी अश्विन पाटील क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

मित्राचा त्याच्या पश्चातही सामाजिक कार्याचा आदर्श कायम ठेऊन मित्र परिवाराने एकत्र येत राबवित असलेल्या व अखंडीतपणे चालू ठेवलेल्या अविरत समाजसेवेचे हे भारत देशातील खूपच दुर्मिळ उदाहरण आहे. समाजात अशी उदाहरणे खूपच कमी प्रमाणात पहावयास मिळतात.अश्विन पाटील क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्य अश्विन पाटील यांचे मित्र परिवार पुढे नेत असून वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम राबवून समाजात जनजागृती करण्याचे काम ही संस्था करीत असल्याने या संस्थेच्या कार्याचे, मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE