माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
उरण दि १(विठ्ठल ममताबादे ) : शिवसेना जे बोलते ते करून दाखवते. याचा प्रत्यक्ष अनुभव चिरनेर गावातील ग्रामस्थांना आला आहे.माजी आमदार व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर हे चिरनेर ग्रामस्थाचे ग्रामदैवत असणारे बापुजीदेव मंदीरच्या सभामंडपाच्या उद्धाटन प्रसंगी आले असता शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर व शिवसेना व युवासेना शाखा चिरनेर-भोम व सर्व शिवसैनिकांनी माजी आमदार व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्याकडे चिरनेर परिसर व चिरनेर गावाच्या विकासासाठी विकासनिधीची मागणी केली असता सदर चिरनेर गावाच्या विकासासाठी विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या शब्द चिरनेर ग्रामस्थाचे ग्रामदैवत असणारे बापुजी देवासमोर दिला होता. तो शब्द त्यांनी युवासेनाप्रमुख,शिवसेना नेते व तत्कालीन पर्यावरण,पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून व पत्र व्यवहार करुन खालील विविध कामांसाठी एकूण रुपये ४,३५,००,०००/-(अक्षरी रुपये चार कोटी पस्तीस लाख मात्र) निधी मंजूर करुन माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मनोहरशेठ भोईर यांनी चिरनेर महागणपती वर त्यांची आसणारी श्रध्दा व चिरनेर गावावर असलेले त्यांचे प्रेम दाखवून दिले आहे. या पैकी पहिल्या टप्प्यात खालील कामे मंजूर झाली आहेत.
१.बहुद्देशिय सभाग्रुहासाठी ३० लाख रुपये२.चिरनेर रांजणपाडा रंगमंचासाठी १२ लाख रुपये३.चिरनेर बैाध्दवाडा ते महागणपती मंदीरापर्यंत रस्ता १५ लाख रुपये४.भोम कमान ते महागणपती मंदीरापर्यंत रस्ता ५३ लाख रुपये५.बापुजी देव मंदीर सुशोभिकरणासाठी ८ लाख रुपये६.बापुजी देव मंदीर परिसर विदुयतीकरणासाठी ५ लाख रुपये७.चिरनेर साईनगर कडे जाणार्या रस्त्यासाठी ९ लाख रुपये.
सदरच्या कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे व माजी आमदार व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांचे शिवसेना व युवासेना शाखा चिरनेर-भोम व सर्व चिरनेर ग्रामस्थांच्या वतीने मनःपुर्वक आभार मानण्यात आले आहे.