गणेशोत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठोकूर दरम्यान दररोज विशेष गाडी धावणार !
32 अतिरिक्त फे-यांपाठोपाठ रेल्वेकडून कोकणवासीयांना आणखी एक खूषखबर
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर आधी जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांच्या 32 अतिरिक्त फेऱ्या जाहीर केल्या असतानाच या मार्गावर गणेशोत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठोकूर दरम्यान रोज धावणारी विशेष गाडी जाहीर करण्यात आली आहे.
याआधी32 अतिरिक्त फेरा जाहीर करण्यात आले आहेत. या पाठोपाठ आता कोकण रेल्वेने 01153/ 01154 या कामांकडे धावणारी आणखी एक विशेष गाडी जाहीर केली आहे.
ही गाडी दिनांक 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत दररोज धावेल. ही गाडी मुंबई ते लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री सव्वा दहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता ती कर्नाटकमधील ठोकुरला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी दिनांक 14 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत ठोकूर येथून संध्याकाळी साडेसात वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
चोवीस डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे,, संगमेश्वर रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी, करमाळी, मडगाव, कारवार, कुमटा, गोकर्ण रोड, मुर्डेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड, बिंदुर, कुन्दापुरा, मुलकी आणि सुरतकल या स्थानकांवर थांबे घेत कर्नाटकमधील ठोकुरला तिचा प्रवास संपणार आहे.