मनसेच्या जितेंद्र चव्हाण यांची नाविक सेनेच्या सरचिटणीसपदी निवड
संगमेश्वर : तालुक्यातील कडवई गावचे सुपुत्र मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांची नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेच्याल राज्य सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राजठाकरे यांच्या आदेशावरून ही निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीनंतर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एक सामान्य महाराष्ट्र् सैनिक ते राज्य सरचिटणीस पदी झालेली निवड हीच आपल्या समाजकार्याची पोचपावती असून राजसाहेबांनी आपल्यावर विश्वासाने सोपवलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडू व संघटनेला बळकटी देण्याचे काम सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्याने करु अशी ग्वाही या निवडीनंतर जितेंद्र चव्हाण यांनी दिली .
मनसेच्या स्थापनेपासून जितेंद्र चव्हाण यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला .त्यानंतर आपल्या आक्रमक स्टाईलने विविध आंदोलनातून समाजातील अनेक समस्या पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केल्याचे दिसून येते .धामणी यादववाडी ब्रिज , कडवई रेल्वे स्टेशन, कडवई बीएसएनएल टॉवर, कॉलेजची मान्यता अशी अनेक कामे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून चिकाटीने केल्याचे दिसून येते .कोरोना काळात वीजबिल माफी मिळावी, यासाठी त्यांनी आंदोलन छेडले होते. कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गलथांन कारभाराविरोधात छेडलेल्या आंदोलनानंतर त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना तडीपारी सारख्या कारवाईला सामोरे जावे लागले होते.
सुरवातीला संगमेश्वर उपाध्यक्ष नंतर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष व गेली दहा वर्षे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते . चव्हाण हे राज ठाकरे यांचे विश्वासू व निष्ठावन्त सहकारी म्हणून ओळखले जातात .त्यानि कडवई जिल्हापरिषद गटातून निवडणूकित ही प्रस्थापित राजकीय पक्षांना आपली दखल घ्यायला लावल्याचे बोलले जाते.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनी जिल्हा कार्यकारिणीत केलेले बदलानंतर जितेंद्र चव्हाण यांचे समर्थक नाराज झाल्याचे पहायला मिळाले .कार्यकर्त्याना विश्वासात न घेता जिल्हाध्यक्ष पदी अविनाश सौंदलकर यांची नियुक्ती केल्याचा आरोप मनसेच्या जिल्हाभरातील अनेक पदाधिकार्यांनी केला आहे., तशा तक्रारी ही पक्षनेतृत्वाकडे करण्यात आल्या असल्याचे समजते .यावेळी त्यांना राज्यस्तरावर बढती मिळणार असल्याचे बोलले जात होते .
नुकतीच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेची राज्य कार्यकारणी जाहीर केली . यात अध्यक्ष पदी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली . तर जितेंद्र चव्हाण यांना सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आले .चव्हाण यांच्या निवडीचे जिल्हाभरातून स्वागत करण्यात येत आहे .आपल्यावर राजसाहेबांनी विश्वासाने टाकलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडू व आपल्या सर्व सहकाऱ्यांसह पक्ष संघटना बळकट करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी जितेंद्र चव्हाण यांनी दिली .