महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेच्या सरचिटणीसपदी अतुल भगत
उरण दि. 10 (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी व महाराष्ट्रातील समस्यांना न्याय देणारी आक्रमक संघटना असून या पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेच्या पदावर विविध पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेच्या राज्य सरचिटणीसपदी उरणचे सुपुत्र, रायगड जिल्ह्याचे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा पुष्पा परशुराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतूल भगत यांची नियुक्ती पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी केले आहे.
अतूल भगत हे उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे सुपुत्र असून भेंडखळ ग्रामपंचायतचे त्यांनी सरपंच पद भूषविले आहे . त्यानंतर विविध पदे त्यांनी भूषविले.मनसेचे उरण तालुकाध्यक्ष तसेच रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले.अतुल भगत यांनी सुरवातीपासूनच मनसेचे कार्य व विचार तळागाळात पोहोचविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत राजसाहेब ठाकरे यांनी अतुल भगत यांची नाविक सेनेच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.अतूल भगत यांची सरचिटणीसपदी निवड झाल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून, विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तर अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.