राजापूर-कोल्हापूर जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळली

घाटात एकेरी वाहतूक : काम युद्धपातळीवर

राजापूर : राजापूर तालुक्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात बुधवारी मध्यरात्री ते गुरुवार पहाटेच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच राजापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्ग सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले असून गुरुवारी सकाळी घाटातील दरड काही प्रमाणात हटवण्यात आली. सध्या या घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. मात्र नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE