महालन सामाजिक संस्था आणि उरण दक्षता समिती यांचा उपक्रम
उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) : महालन सामाजिक संस्था आणि उरण दक्षता समिती यांच्या वतीने पोलीस बांधवाना आणि तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्गांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली.दरवर्षी हा उपक्रम साजरा केला जातो.यंदाचे हे 23 वे वर्षे आहे. उरण पोलिस स्टेशन आणि तहसील कार्यालयमध्ये रक्षाबंधन चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,नायब तहसीलदार नरेश पेडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील,सर्व पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित होते.महालन सामाजिक संस्थाचे अध्यक्षा सीमा अनंत घरत, महिला सामाजिक कार्यकर्त्या नयना पाटील, कविता म्हात्रे,नयना ठाकूर , मोनिका चौकेकर,सामिया बुबेरे आदी महिलांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना राखी बांधल्या.
पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच तहसील कार्यालय मधील अनेक शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबापासून लांब राहावे लागते. शासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग समाजासाठी रात्रं दिवस राबतात. त्यांना कुटुंबासाठी वेळ नसतो. म्हणून त्यांच्याप्रती कर्तव्य भावनेतून त्यांचा आदर राखत दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते अशी माहिती महालन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सीमा घरत यांनी दिली.