उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) : पाणदिवे येथिल सुप्रसिद्ध वेल्डिंग वर्क्सचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम चंद्रकांत ठाकूर यांचे शनिवार दि 10/9/2022 रोजी हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 74 वर्षे होते.
हरिश्चंद्र भोईर यांच्या उदय इंडस्ट्रीजमध्ये नोकरी केलेल्या आणि पत्नीच्या दुःखद निधनानंतर कुटुंबाचा संपूर्ण आधार बनलेल्या स्व.राजाराम ठाकूर यांनी गावी स्वतःचा वेल्डिंग व्यवसाय सुरू करून आपले कुटुंब सावरले. वय झाल्यानंतर सुद्धा वेल्डिंगची छोटी मोठी कामे करत मेहनत आणि कष्ट करणाऱ्या स्व.राजाराम ठाकूर यांच्या मागे दोन मुलगे एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.अंत्यविधीस रात्र असतानाही मोठा जनसमुदाय उपस्थित राहून हळहळ व्यक्त करत होता.त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दि. 19/9/2022 रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर येथे तर उत्तर कार्य विधी गुरुवार दि. 22/9/2022 रोजी राहत्या घरी पाणदिवे येथे होणार असल्याची तसेच कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नसल्याची माहिती त्यांचे चिरंजीव संदेश आणि अजित ठाकूर यांनी दिली आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम चंद्रकांत ठाकूर यांचे निधन
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |
Prev Post
Next Post