सन्मित्र गणेश मंडळाचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव
उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे ) : लोकमान्य टिळकांनी ज्या पवित्र हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता त्याच पवित्र उद्देशाने सन्मित्र गणेश मंडळ पाणदिवे यांनी 1972 साली सूरू केलेल्या साखर चौथ गणेशोत्सवाला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत.अध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या गावात अनेक सण उत्सव नेहमीच शासकीय नियम पळून व विविध समाजिक उपक्रम राबवून साजरे केले जातात.या वर्षीही सन्मित्र गणेश मंडळाने साखर चौथा गणेश उत्सवात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, महिलांसाठी खेळ पैठणीचा, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा,दररोज भजन सेवा असे विविध उपक्रम आयोजित केले आहेत.
सन्मित्र गणेश मंडळाचे हे पन्नासावे वर्ष असल्याने रविवार 11/9/2022 रोजी श्री गणेशाचा पाट पूजन सोहळा पार पाडून पूर्ण गावात भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची मिरवणूक काढली व बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले.श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा मंगळवार दिनांक 13/9/2022 रोजी सकाळी 11.50 होणार असून, गुरुवार दिनांक 15/9/2022 रोजी संध्याकाळी 4.00 वाजता सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे व रविवार दिनांक 18/9/2022 श्री विधिवत विसर्जन सोहळा आयोजित केला आहे. सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सन्मित्र गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.